माणगंगा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध राजेंद्रअण्णा गटाचे अर्ज माघारी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथील सोनारसिद्धनगर येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख गटाने आज नामनिर्देशन पत्रे माघार घेण्याच्या दिवशी सर्व अर्ज माघारी घेतल्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली होती. त्यामध्ये माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख गट व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील गटाने निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. आज नाम निर्देशन पत्रे माघार घेण्याचा दिवस होता. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख गटाने सर्व उमेदवारी अर्ज माघार घेतल्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.