कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल गवळी यांचा सत्कार

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे
नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेले माडगुळे गावचे विठ्ठल महादेव गवळी यांचा आज आटपाडी येथील सुदर्शन फ्रुट सप्लायर्स कंपनी व इतर अडतदारांच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न झाला.
विठ्ठल गवळी हे माडगुळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच होते. सध्या त्यांच्या पत्नी सौ.संगीता विठ्ठल गवळी ह्या सरपंच आहेत.
यावेळी सुदर्शन विभुते, हर्षल विभुते, वामन लाडे, विजय खळगे ,रमेश नसले, माजी सरपंच बापूसाहेब विभुते ,संजय (आप्पा) विभुते, वसंत राजाराम विभुते, अडतदार व व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.