आटपाडी मार्केट कमिटीचे संतोष पुजारी सभापती तर राहुल गायकवाड उपसभापती

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे संतोष पुजारी यांची निवड झाली आहे. उपसभापतीपदी राहुल गायकवाड यांची निवड झाली आहे.
निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष सुरू केला आहे.
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काटा लढत होऊन दोन्ही गटाचे नऊ-नऊ असे उमेदवार निवडून आले होते. यामुळे तालुक्यासह संपूर्ण राजकीय क्षेत्रातील लोकांचे याकडे लक्ष लागले होते.
आज सभापती निवडीच्या झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर बाजार समितीच्या सभापतीपदी 10 मते मिळवून संतोष पुजारी हे सभापती झाले असून राहुल गायकवाड यांनाही दहा मते मिळाली आहेत. त्यांची उपसभापती म्हणून निवड झाली आहे.