
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावीचा) निकाल आज 25 मे 2023 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.
कला,वाणिज्य,विज्ञान आणि तांत्रिक शिक्षणासंबंधीच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी पदवी शिक्षणासाठीच्या प्रवेशांसंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत.
येथे पहा निकाल/निकालासाठी वेबसाईट:
परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होणार आहे.
तसेच mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahresults.org.in या लिंकवर जाऊनही निकाल पाहता येणार आहे.
यावर्षी साधारणतः 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. उद्या 14 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणार आहे. बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये सध्या वरील तीन संकेतस्थळांचा उल्लेख करण्यात आला आहे. या संकेतस्थळांवर कोणत्या विषयांत किती मार्क मिळाले इथपासून विद्यार्थ्यांना निकालाची टक्केवारीही कळणार आहे.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंडळाला किंवा निकालासाठी देण्यात आलेल्या कोणत्याही संकेतस्थळाला भेट दिली असता तिथं त्यांना प्राथमिक माहितीचा तपशील भरून पुढे Marksheet पाहता येईल.
निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तिथं विद्यार्थानी काळजीपूर्वक सर्व माहिती आणि हॉलतिकीट क्रमांक भरावा. निकाल पाहण्यासाठी 14 लाखांहून अधिक विद्यार्थी एकाच वेळी Website ला भेट देणार असल्यामुळं त्यामध्ये काही तांत्रिक अडचणीसुद्धा येऊ शकतात. असं झाल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काही वेळानंतर निकाल पाहण्यचा प्रयत्न करावा हे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश