मुख्याध्यापक अशोक राऊत यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
दिघंची/आटपाडी

दिघंची येथे आयोजित राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक अशोक गंगाधर राऊत (आबा) यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न झाला.
छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच अमोल मोरे बोलताना म्हणाले,सेवेच्या ३४ वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी निष्कलंक सेवा केली.सुख म्हणजे काय असतं त्यांच्या कुटुंबाकडे पाहून सर्वांना समजेल.
प्रमुख पाहुणे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन विनायक शिंदे, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे, शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस अविनाश गुरव,प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक शरद चव्हाण, उपसरपंच विष्णू यादव, पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अरुण पाटील, सनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष नामदेव सासणे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब होनराव,मुन्ना तांबोळी,संजय वाघमारे,आप्पासाहेब गोंजारी, शिक्षक संघाचे सहसचिव हणमंतराव गायकवाड, गट साधन केंद्राचे वित्त व लेखा अधिकारी प्रशांत चंदनशिवे,जगन्नाथ जाधव, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन गळवे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष आसिफ मुजावर,जिल्हा उपाध्यक्ष रफीक सपाटे,प्रवक्ते नारायण कदम, मुख्याध्यापिका काळे,गणेश माने,अभिजीत लिमकर,अशोक लिमकर, केंद्रप्रमुख रुपेश जंगम, कुंडलिक केंगार, प्रशांत कडव, दिलीप पाटील,शिवाजी शिर्के,महेश गोंजारी, अंगणवाडी सेविका तालुकाध्यक्ष मोरे, आरपीआयच्या महिला तालुकाध्यक्ष सुष्मिता मोटे,टी.के.जावीर,जीवन सावंत, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संजय कबीर,अरुण मोरे,उत्तम मोरे,अविनाश रणदिवे आदि उपस्थित होते.
प्रास्ताविक निलेश गोंजारी यांनी केले.रविंद्र भोसले यांनी सूत्रसंचालन केले.अशोक राऊत,दत्तात्रय मोरे,आप्पासाहेब गोंजारी, शिक्षक तानाजी ढोले, विद्यार्थिनी स्नेहल शिरकांडे,प्रतिक राऊत,हरिदास जावीर, आदींनी मनोगत व्यक्त केले.