
आज ‘यांनी’ भरले अर्ज! आजअखेर एकूण १६७ अर्ज दाखल
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी एकूण ८५ नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली. आजअखेर एकूण १६७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय पीक कर्ज वाटप करणाऱ्या संस्था शेतकरी मतदार संघ यासाठी ११ सदस्यांची निवड करण्यात येणार असून यामध्ये सात सर्वसाधारण, दोन महिलांसाठी राखीव, एक इतर मागास प्रवर्ग राखीव व एक भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग यासाठी राखीव जागा आहेत. तसेच ग्रामपंचायत शेतकरी मतदार संघासाठी चार जागा असून सर्वसाधारण दोन आणि अनुसूचित जाती जमाती साठी तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी प्रत्येकी एक जागा राखीव आहे. अडते व व्यापारी मतदारसंघासाठी दोन जागा, हमाल व तोलाईदार मतदारसंघासाठी एक जागा अशा एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ३० एप्रिल रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे व त्यानंतर पाच वाजलेपासून पुढे मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे.
आज शेवटच्या दिवशी अडते व व्यापारी गटातून सुबराव पाटील, प्रकाश देशमुख, खलील मुलाणी, संदे दस्तगीर, सुनील तळे, विठ्ठल सरगर, विष्णू अर्जुन या सात जणांनी, सहकारी संस्था भ.जा.वि.ज. गटातून शशिकांत म्हारनुर यांनी, कृ.प. सर्वसाधारण गटातून राजाराम विभुते, वासुदेव लेंगरे, भोजा सावत, पांडुरंग देशमुख, रमेश चव्हाण, अजित चव्हाण, विशाल ढगे, उत्तम काळे, मारुती पाटील, सुनील चव्हाण, प्रभाकर पुजारी, ऋषिकेश देशमुख, अमोल विभुते, गौरीशंकर शिरकांडे, नितीन होनराव, पांडुरंग गायकवाड, संभाजीराव पाटील, सर्जेराव घुटुगडे, बबलू गाढवे,लक्ष्मण सरगर, संदेश खटके, सचिन सरगर, उत्तम ढोले, एकनाथ गायकवाड, विजय पुजारी, श्रीरंग भोसले, भगवान पाटील, राजू अर्जुन, अजित जाधव, परशुराम सरक, अंकुश यमगर, अनिस खाटीक, गणपत गायकवाड, बापूसो गायकवाड, किसन काळे, कैलास देवडकर, ब्रह्मदेव होनमाने ,सर्जेराव राक्षे, शहाजी शिंदे, उमेश ढगे, संजय पुजारी यांनी तसेच महिला गटातून वनिता पाटील, सिंधुबाई गटकुळे, मीना विभुते, वनिता पाटील, मालन मेटकरी, राजाक्का लेंगरे, मालन झंजे, राजाक्का म्हारुगडे, कल्पना गवळी, शालन खरजे, हिराबाई देवडकर, संगीता मेटकरी, तसेच ग्रामपंचायत गटातून शंकर भिसे,सुरेश केंगार, आदिनाथ जावीर, सुभाष माने, दत्तात्रय मोरे, महादेव रणदिवे,सुरेखा सवणे यांनी तर ग्रामपंचायत गटातून विलास काळेबाग, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातून नामदेव देशमुख,विठ्ठल बाड, प्रशांत गाढवे,नामदेव देशमुख, उत्तम काळे, तौफिक तांबोळी, रमेश चव्हाण, सुशांत सावंत, मारुती म्हारगुडे, विष्णू जाधव, प्रभाकर पाटील, सोमनाथ मोरे, अक्काताई जाधव, निलेश पाटील, विठ्ठल बाड आणि सहकारी संस्था भजा वि ज गटातून शिवाजी बेरगळ यांनी असे एकूण ८५ अर्ज आज दाखल करण्यात आले आहेत. आज अखेर एकूण १६७ नामनिर्देशक पत्र दाखल करण्यात आली असून २७ मार्च रोजी तीन, २८ मार्च रोजी ३, २९ मार्च रोजी १५ तसेच ३१ मार्च रोजी ६१ नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन