

सर्वच १९ जागांवर विजय
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी पुरोगामी पॅनलने सर्वच्या सर्व १९ जागा मिळवून पुन्हा आपला झेंडा लावला आहे.
शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली या शिक्षकांच्या पतपुरवठा करणाऱ्या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यासाठी शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले व आज त्याची मतमोजणी झाली.सत्ताधारी पुरोगामी पॅनल व राजर्षी शाहू परिवर्तन पॅनल यांच्यासह दोन अपक्ष उमेदवार यांनी सर्वसाधारण गटामधून निवडणूक लढवली होती. त्याचबरोबर दोन महिला राखीव तसेच एक अनुसूचित जाती जमाती राखीव,एक नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि एक भटक्या विमुक्त जाती/जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गामधून प्रत्येकी एक उमेदवार निवडण्यासाठी दोन्ही गटासह अपक्ष उमेदवार उभे होते.
आज झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी पुरोगामी पॅनलचे सर्वसाधारण गटातील सर्व १४ उमेदवार, दोन महिला राखीव व अन्य राखीव प्रवर्गातील प्रत्येकी एक असे एकूण १९ उमेदवार विजयी झाले आहेत.
सर्वसाधारण गटातील उमेदवार व त्यांची प्राप्त मते पुढीलप्रमाणे:
१) चव्हाण अजित तुकाराम २०७५
२) धायगुडे चंद्रशेखर संभाजी २०४०
३) घाडगे संताजी बाबुराव २६१७ (विजयी)
४) घागरे बजरंग दगडू २५४८ (विजयी)
५) घोडे आनंदा बंडू २४३७ (विजयी)
६) गोसावी अशोक भगवान १८५६
७) जाधव नितीन प्रकाश २४९८ (विजयी)
८) जैनापुरे अरविंद कुमार २२५४ (विजयी)
९) कर्नाळे अभय बाळासो १८२७
१०) कटारे बाळासो लालासो २१०३
११) कुंभार संजय निनाप्पा २६५२ (विजयी)
१२) माने सुधाकर दत्तात्रय २०१७
१३) नागरगोजे राजेंद्र सुभाष २०२८
१४) नाईक संतोष तुकाराम २६३१ (विजयी)
१५) पाटील अनंत कलगोंडा १८०१
१६) पाटील अरुण गजानन २५०३ (विजयी)
१७) पाटील भाऊसाहेब रामचंद्र २०२४
१८) पाटील धनाजी शिवाजी १९७४
१९) पाटील राजाराम पांडुरंग २५३३ (विजयी)
२०) पाटील संदीप भगवान २५८५ (विजयी)
२१) पाटील शरद सोपान २१५४
२२) पाटील विकास लक्ष्मण १३३
२३) पवार संजय बापू १९०४
२४) पवार तानाजी आप्पासो १९५५
२५) शिंदे विशाल विलासराव २५३४ (विजयी)
२६) वाजे महावीर कुमार २२८४ (विजयी)
२७) वाटवे संतोष शशिकांत २३५३ (विजयी)
२८) यादव धनपाल पांडुरंग २३१२ (विजयी)
२९) यमगर हिम्मतराव आण्णासाहेब ५४१
३०) झांबरे संजयकुमार शहाजी १९५८
अपात्र (बाद) मते – २५५
राखीव गटातील विजयी उमेदवार व त्यांची मते पुढीलप्रमाणे:
महिला राखीव
१) पाटील निलांबरी राजेंद्र २७४७
२) यादव राणी शिवाजी २३११
अनुसूचित जाती-जमाती राखीव
१) गोंधळे शैलेंद्र शामराव २६८१
इतर मागास प्रवर्ग
१) खांडेकर राजेंद्र शिवदास २८५९
भटक्या विमुक्त जाती/जमाती, विशेष मागास प्रवर्ग
१) बन्ने प्रकाश बाबुराव २७७०
विजयी उमेदवारांची निवड घोषित होताच गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत सत्ताधारी पुरोगामी पॅनलच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.विजयी उमेदवारांचे सर्वांनी अभिनंदन केले.विजय उमेदवारांनी मतदारांचे आभार मानले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन