

प्रगल्भनायक न्यूज
आटपाडी
आटपाडी तालुक्यात पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आटपाडी तालुक्याच्या वतीने सोमवारी शासकीय विश्रामगृहात पक्षात काम करु इच्छितांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचितचे तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांनी दिली.
जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे व ज्येष्ठ नेते अरुणभाऊ वाघमारे यांच्या उपस्थितीत मुलाखती घेतल्या जाणार असून आगामी निवडणुकाच्या दृष्टीने संघटन बांधणी अधिकाधिक मजबूत करून तालुक्यातील नवीन कार्यकर्त्यांना संधी निर्माण करण्यासाठी या मुलखतीचे आयोजन केले असून तालुक्यातील सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी या मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन चंदनशिवे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन