इंदापूर तालुक्यातील अनेक मान्यवरांकडून सामाजिक,शैक्षणिक,कला,क्रीडा नाट्य,सांस्कृतिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव
इंदापूर/ तालुका प्रतिनिधी:
लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील ह. भ. प .आबा महाराज उगलमोगले यांची विश्व वारकरी सेना या संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली असून विश्व वारकरी सेना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. अरुण विष्णुपंत बुरघाटे, राष्ट्रीय जेष्ठ अध्यक्ष ह.भ.प. तुकाराम पंढरीनाथ चवरे , राष्ट्रीय युवक अध्यक्ष जगन्नाथ शेषराव देशमुख , महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष गणेश महाराज शेटे, पुणे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प बापुसाहेब ढगे महाराज, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, ह.भ.प महादेव महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी सांप्रदायिक व सामाजिक कार्य याची दखल घेऊन वरील मान्यवरांच्या उपस्थित विश्व वारकरी सेना या संघटनेच्या पुणे जिल्हा उपअध्यक्ष ह. भ .प आबा महाराज उगलमोगले यांची निवड करण्यात आली असून ह. भ .प आबा महाराज उगलमोगले हे शेतकरी, वारकरी संप्रदायातील कुटुंबातील असून आणि लाखेवाडी गावातील एक वारकरी संप्रदायातील घराणे म्हणून ओळखलं जाते .
सामाजिक कार्य असो , राजकीय असो , समाजसेवा असो , शैक्षणिक असो सर्व कार्यामध्ये आबा महाराज यांचा सहभाग असतो.
लाखेवाडी गावामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. सामाजिक, राजकीय , शैक्षणिक, पत्रकार या क्षेत्रामध्ये हे काम करत असतात अशा या बहुगुणी व्यक्तिमत्त्वाची निवड झाल्याबद्दल लाखेवाडी गाव आणि इंदापूर तालुक्यातून राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक , नाट्य , सांस्कृतिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून इंदापूर तालुक्यातील वारकरी सांप्रदायिक मंडळींच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आमचे प्रतिनिधी कैलास पवार यांनी आबा महाराज उगलमोगले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असता वारकऱ्यांच्या अनेक समस्या असून या समस्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करून वारकरी सांप्रदायिक व वारकरी मंडळींना न्यायचं काम करणार असून थोड्या दिवसांमध्ये इंदापुर मध्ये एक सुंदर कार्यक्रम घेऊन त्याचा शुभारंभ करणार आहे असे आमचे प्रतिनिधी कैलास पवार यांच्याशी चर्चा करताना सांगितले आहे.


संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु