प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये आज 54782 मतदारांपैकी 44281 मतदारांनी आपला मताधिकार बजावला. आटपाडी तालुक्यात एकूण 80.83% मतदान पार पडले. यामध्ये 28 हजार 696 पुरुष मतदारांपैकी 23 हजार 246 पुरुष मतदारांनी आणि 26086 पैकी 21 हजार 035 स्त्री मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
झरे येथे मतदान केंद्रावर वाद झाला. परंतु हा वाद सामोपचाराने मिटविण्यात आला. दिघंची, पळसखेल, पडळकरवाडी, कौठूळी येथे किरकोळ बाचाबाची झाली. अन्यत्र मतदान शांततेत पार पडले
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रामुख्याने भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये लढत झाली. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिलराव बाबर समर्थक तानाजीराव पाटील यांच्यातच खरा सामना झाला.
खरसुंडी येथे दोन्ही काँग्रेसमुळे आणि दिघंची येथे राष्ट्रवादीमुळे चुरशीची तिरंगी लढत होती. तालुक्यातील आवळाई, गोमेवाडी, कुरुंदवाडी, माळेवाडी, पारेकरवाडी, तडवळे, उंबरगाव, यपावाडी, खरसुंडी, पुजारवाडी(दि), गळवेवाडी, पिंपरी बु, बाळेवाडी, जांभुळणी, कौठुळी, पडळकरवाडी, घाणंद, हिवतड, कामथ, पळसखेल, दिघंची, लिंगीवरे, राजेवाडी, वलवन, येथे शांततेत मतदान पार पडले.
पडळकरवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या मातोश्री सरपंच पदाच्या उमेदवार हिराबाई पडळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.
यामध्ये जवळपास
दिघंची 80 %
उंबरगाव ८४%
राजेवाडी 87%
पुजारवाडी दि. 86%
पळसखेल 85%
लिंगीवरे 85%
आवळाई 83%
गळवेवाडी 90%
खरसुंडी 73 %
यपावाडी 88%
झरे ८२ टक्के
गोमेवाडी ७७ %
हिवतड 86 %
पडळकरवाडी 90%
जांभुळणी 86%
कामथ 80%
तडवळे 80%
माळेवाडी 87%
घाणंद 73%
पिंपरी बुद्रुक ६९%
कुरुंदवाडी 69%
वलवण ६२.९८%
बाळेवाडी ८६.५८ %
कौठुळी ८५.६२ %
मतदान झाले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन