‘गुजरात तुपाशी,महाराष्ट्र उपाशी’ घोषणा देत सांगलीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड

महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातच्या घशात घातल्याचा आरोप करत शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात सांगली जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
‘गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी’ अशा घोषणा देत सांगलीमध्ये महात्मा पुतळा स्टेशन रोड येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महिला राष्ट्रवादीच्या वतीने शिंदे-फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे, महिला सांगली जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सांगली शहर अध्यक्षा अनिता पांगम, मिरज शहर अध्यक्षा वंदना चंदनशिवे, अनिता पाटील, मेघा पाटील, गांधी, छाया जाधव, अनिता कदम, वंदना चंदनशिवे, अलका माने, वैशाली कळके, गीतांजली इरकर, उषा गायकवाड, वैशाली पाटील आदी सहभागी झाल्या.
सांगलीत स्टेशन रोड येथे सरकारच्या विरोधात जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आंदोलन केले.