किल्ले बांधणी स्पर्धेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

डेस्टिनी फाउंडेशन व रमाकांत भाऊ सोहनी युवामंच गोमेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गेली ५ वर्षे शिवकालीन किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित केली जाते.
यावर्षी स्पर्धेसाठी मोठा व लहान असे दोन गट करण्यात आले आहेत. त्यासाठी आजपर्यंत अनेक स्पर्धकांनी आपले नाव नोंदवले आहे. या स्पर्धेविषयी पंचक्रोशीत नेहमीच वेगळा उत्साह दिसत असतो.
स्पर्धेसाठी यावेळी भाऊसो शिंदे, रामहरी कदम, संतोष सरगर, रविंद्र सरगर लक्ष्मण कदम, नाथबाबा सरगर, प्रविण देवकुळे, उत्तम कदम, दिपक मोटे, संतोष काळे, अमोल जावीर, मुन्ना मुलाणी, विजय भोसले, मनोहर जावीर, तातोबा जावीर, आप्पा लवटे, दिनकर जावीर यांनी सहकार्य केले आहे. जवळजवळ २२ हजार रुपयांची रोख बक्षिसे ठेवली आहेत.
शिवकालीन परंपरा संस्कृती जपताना तरुणांचे मन किल्यांसारखे अभेद्य रहावे, यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे यामध्ये आपला सहभाग घ्यावा, असे आवाहन रमाकांत सोहनी व रोहित देवकुळे यांनी केले.
यावेळी सुभाष व्हनमाने,सोमनाथ झेंडे, विजय कोरे, रोहित सोहनी, अनिकेत कदम, समाधान सोहनी, दिपक देवकुळे, संतोष जावीर, उपस्थित होते.