प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
बरगेवाडी
राज्य सरकारने गावच्या विकासासाठी थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार बरगेवाडी तालुका राधानगरी येथील गावच्या पहिल्या लोकनियुक्त सरपंचपदी जयवंत केरबा बरगे यांना लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान मिळाला आहे. मिळालेल्या कालावधीमध्ये सरपंच यांनी विकासकामांच्या माध्यमातून गावचा चेहरा-मोहरा बदलावा, असे उद्गार भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील आनंदराव पाटील यांनी काढले. ते नूतन सरपंच जयवंत बरगे यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.
यापूर्वी विकासकामे करताना बऱ्याच अडचणी निर्माण व्हायच्या. येणारा निधी जिल्हा परिषद, पंचायत समिती, यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत खात्याकडे वर्ग केला जात होता.आता या सर्वच बाबींमध्ये बदल होऊन हा थेट निधी ग्रामपंचायतच्या खात्यावर वर्ग होत आहे.चौदाव्या, पंधराव्या वित्त आयोगातून भरीव निधी मिळतो. त्यामुळे सरपंच पदाधिकाऱ्यांना गावचा विकास करण्यास निधीची कमतरता भासत नाही. मतदारांनी आपल्याला दिलेला विजयाचा कौल,पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विकास कामे करून गावाचा विकास करावा,अशाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सत्कारप्रसंगी भोगावती साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आकाराम चरापले, जवाहर सोसायटीचे उपाध्यक्ष संजय बळवंत, भिवा बरगे, ज्योतिर्लिंग पतसंस्थेचे अध्यक्ष सदाशिव पाटील, शिवाजी पाटील, केरबा बरगे उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन