मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडा-पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे

संदिप बरगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
बरगेवाडी

राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी गावासाठी रविवारी मतदान होत असून सर्व मतदारांनी ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी तसेच विजय उत्सव शांततेत संपन्न करावा कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये असे आव्हान राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरवाडे साहेब यांनी केले ते ग्रामपंचायत बरगेवाडी इथे बोलवण्यात आलेल्या उमेदवार व मतदारांच्या शांतता बैठकीत बोलत होतेे.
मतदान प्रक्रिये दरम्यान 100 मीटर परिसरात तसेच मतदान केंद्र परिसरात मतदार व मतदान प्रतिनिधी यांच्याशिवाय कोणीही आत येणार नाही तसेच मतदान प्रक्रिये वेळी शांतता भंग करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत असल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून तसेच वैयक्तिक हेवेदावे टीका कोणी करू नये अशा सक्त सूचना निरवाडे साहेब यांनी दिल्या
गोपनीय अधिकारी यादव साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनातून निकाल घोषित झाल्यानंतर विजय मिरवणूक शांततेत पार पाडावी तसेच इतर कोणतेही कृत्य करू नये असे सूचना उमेदवारांना दिले आहेत
राधानगरी तालुक्यातील छोटे आणि आदर्श गाव म्हणून या बरगेवाडी ची ओळख आहे येथील युवक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले करिअर साध्य करत आहेत इथून पुढे सामाजिक एक्य असेच राहावे असेही त्यांनी आपल्या मनोगत यातून व्यक्त केले
प्रत्येक निवडणुकीत विजय आणि पराजय या दोन्ही गोष्टी ठरलेल्या असतात त्यामुळे उमेदवारांनी या गोष्टीकडे पाहण्याची गरज आहे
निकाल जाहीर झाल्यानंतर कोणीही दुचाकी तसेच इतर कोणत्याही वाहनांचा सायलेन्सर किंवा पुंगळी काढून ग्रामस्थांना त्रास दिला तर ते वाहन जप्त केले जाईल असेही त्यांनी आदेश दिले आहेत
या शांतता बैठकीला पोलीस उपनिरीक्षक नजीर खान साहेब पोलीस पाटील उदय बरगे, सरपंच पदाचे सर्व उमेदवार, सदस्य पदाचे सर्व उमेदवार बिनविरोध झालेले उमेदवार तसेच गावातील ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक व आभार संदिप बरगे यांनी मानले.