विजयादशमी म्हणजे दृष्टप्रवृत्तीचा नाश करून मिळणारा विजय
लंकापती रावन हे महान राजनितिज्ञ व पराक्रमी राजा होते, म्हणूनच त्यांना लंकापती रावण संबोधले जायचे.परंतु त्यांच्यात काही दृष्ट व वाईट प्रवृत्ती होत्या.त्यांनी माता सितेचे हरण करून राक्षसीप्रवृतीचा आगास केला. हा त्यांचा सर्वात मोठा गुन्हा होता आणि येथुनच लंकापती रावण परास्त होण्याला सुरूवात झाली.यानंतर रावणाने पुर्णपणे अधर्माचा मार्ग अवलंबला.अधर्माचा मार्ग सोडण्यासाठी देवी-देवता,आप्त-नातेवाईक, राजनैतिज्ञ गुरूसह अनेकांनी प्रयत्न केले.परंतु संपूर्ण प्रयत्न निष्फळ ठरले व सितेला हस्तगत करण्याच्या जीद्दीने रावणाने आपल्याच संपूर्ण कुळाला युध्दाच्या खाईत लोटले व लंकापती रावण यांच्या सर्वनाशाची आकाशवाणी झाली.हळूहळू संपूर्ण मोठ-मोठे बलाढ्य शुरवीर धाराशाही झाले.यात मुख्यत्वेकरून मेघनाथ, कुंभकर्णासारखे महाबलशाली यांनाही रावणाने मृत्यूच्या खाईत लोटले. त्याच प्रवृत्तीचा नाश करण्यासाठीच प्रभुश्रीरामचंद्र हे धरतीवर अवतरले व रावणाच्या वाईट प्रवृत्तीचा रामानी वध केला.
विजयादशमी म्हणजे असत्याचारावर सत्याचा विजय, अशुध्दतेवर शुध्दतेचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय, अमानुषतेवर मानवतेचा विजय, निसर्गाचा होत असलेला ह्रास टिकवुन ठेवण्यासाठी वृक्षलागवड करणे हाही विजयच, म्हणजेच आत्म्यातील रावणाचे दहण करुन रामाने सांगितलेला सत्याचा मार्ग अवलंबने हाच खरा सण विजयादशमी होय.
राम हे आदर्श पुरुष, त्यामुळेच भारताने नेहमी आदर्शाचीच भुमिका जोपासली आहे.तेव्हाच भारतात सर्वधर्मसमभाव दिसून येतो. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत सर्वात महत्वाचा आणि शुभ दिवस म्हणजे “विजयादशमी”.साडेतीन मुहुर्तापैकी एक असे या दिवसाला आगळेवेगळे महत्व आहे. घटस्थापनेपासुन तर दस-यापर्यत संपूर्ण भारतात उत्सहाचे व मांगल्याचे वातावरण आपल्याला पहायला मिळते व याच दिवसापासुन दिवाळीचा शंखनाद संपूर्ण भारतात गुंजतो.
नवरात्र उत्सवामध्ये देवीची 9 दिवस आराधना केल्यानंतर दशमीला म्हणजेच विजयादशमीला दसरा उत्सव मोठ्या थाटात साजता केला जातो. हा दिवस म्हणजे असुरीशक्तीचा नाश व सत्याचा विजय मानले जाते. दशमीला प्रभुरामचंद्राने रावणाच्या वाईट प्रवृत्तीचा संहार करुण असुरीशक्तीला संपवुन मानवतेचे रक्षण केले. त्या निमित्यानेच विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. याच दिवशी मॉ जगदंबेने अनेक राक्षसाचा वध करुण विजय प्राप्त केला. त्याच प्रमाणे पांडव अज्ञातवासात असताना पांडवांनी “आपट्याच्या” झाडावर म्हणजेच सोन्याच्या झाडावर लपविलेली शस्त्रे याच दिवशी काढण्यात आली व याचदिवशी रामाने रावणाच्या वाईट प्रवृत्तीचा वध करुन विजय प्राप्त केल्याच्या अनेक कथांमध्ये व पुराणांमध्ये आपल्याला पहायला मिळते. त्याच अनुशंगाने विजयादशमीला सोन्याच्या पाणाला तितकेच अतुट महत्व आहे. सोन्याचे पान एकमेकांना देवुन आनंदोत्सव साजरा करतात व लहान-मोठ्यांना शुभेच्छा व आर्शिवाद देतात. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी सर्वसामान्य व शेतकरी आपल्या उपयोगात येणाऱ्या संपूर्ण शस्त्रांची (साहित्याची) पूजा करताना फुलांसोबत सोन्याच्या पानांनी पूजा अर्चना केली जाते. यावरुन आपण समजू शकतो की, सोन्याच्या पानाला विजयादशमीच्या दिवशी किती महत्व आहे.
गेली दोन वर्षे कोरोना महामारीने भारतासह संपुर्ण जगाला जखडले होते.त्यामूळे संपुर्ण सण,उत्सव, खेळ यावर जणूकाय संकट आले की काय असे वाटत होते व संपूर्ण सण उत्सवासह व इतरही कार्यक्रम खोळंबले. परंतु आता कोरोना महामारी संपुष्टात आल्याने तब्बल दोन वर्षानंतर रावण दहनाचा कार्यकम संपूर्ण भारतात साजरा होत आहे.देशात वाढते प्रदुषण पाहता विजयादशमीचे औचित्य साधून प्रत्येकांनी वृक्षलागवडीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
लेखक-रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी,नागपूर)
मो.नं.9921690779,
नागपूर


संबंधित बातम्या
आरेवाडीत धुमाकूळ माझ्या साहेबांमुळंच!
आटपाडीकरांनो,सर्वांगिण विकासासाठी बोलते,लिहते,कर्ते व्हा!
गावची वाट… लावायची… की दावायची?