
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
जांभुळणी येथे कृषी सामाजिक समावेशन सेवा पंधरवडा संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत मोफत ज्वारी बियाणे वाटप करण्यात आले.आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे असल्याने मागेल त्याला ज्वारी बियाणे उपक्रम राबविला.तसेच अनुसूचित जातीतील जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. रब्बी हंगाम प्रशिक्षण घेण्यात आले. फुले रेवती ज्वारी बियाणेला जैविक बीजप्रक्रिया कशी करावी. याचे सविस्तर मार्गदर्शन प्रात्यक्षिक कृषी सहायक संजय काळेल यांनी केले.
आत्माअंतर्गत योजनेतील सेंद्रिय परसबाग वाढण्यासाठी महिलांना प्रोत्साहीत करण्याच्या हेतूने देशीवानाचे बियाने वाटप करण्यात आले. कृषीविभागाच्या मार्फत हा कार्यक्रम राबविण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी सरपंच सौ.संगिता मासाळ, माजी सरपंच प्रल्हाद माने,कृषीमित्र पांडूरंग झंजे, माजी चेअरमन महादेव मासाळ, ग्रामरोजगार सेवक अर्जून गावडे , मंडळ कृषी अधिकारी, मा. सुनील लोखंडे, कृषी पर्यवेक्षक, कमलेश घोडके, कृषी पर्यवेक्षक, ए. एस. नाळे, पो.पा.,अनिता पाटील, तसेच गावातील महिला वर्ग , शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा