जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

बळीराजा फाऊंडेशन व कोरो इंडिया मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २० रोजी सायंकाळी ७.०० वाजता जांभुळणी येथे ग्रामपंचायतसमोर पीक व पाणी व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ.संगिता मासाळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. खरसुंडीचे मंडल कृषी अधिकारी एस.व्ही. लोखंडे प्रमुख पाहुणे आहेत. माण-खटाव पंचायत समीतीचे माजी सभापती तथा कोरो इंडियाचे प्रतिनिधी बाळासाहेब रणपिसे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत.
पाणी फौंडेशनचे सुहास पाटील, कोरो इंडिया प्रतिनिधी सचिन लवटे, डॉ. विक्रम गायकवाड,कृषी पर्यवेक्षक के.एस.घोडके, कृषी सहाय्यक एस.बी.काळेल, प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके, घाणंदचे उपसरपंच उमेश ढगे, कुंडलिक कटरे, बळीराजा फौंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तथा बळीराजा फौंडेशनचे संचालक महादेव मासाळ, सुनिल जाधव,उत्तम वाकसे, पांडूरंग झंजे, महेंद्र वाघमारे, सलीम मुलाणी, खजिनदार यशवंत माळी, उपाध्यक्ष मारूती देशमुख हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना जलबचतीचे महत्व समजेल व महिलांना पाण्यामुळे होत असलेल्या त्रासाला कसे सामोरे जावे लागते? ह्याचा ऊहापोह होईल, तसेच जलबचतीचे महत्व समजल्याने अर्थक्रांती होईल.
कार्यक्रमाचे नियोजन बळीराजा फौंडेशनच्या जयश्री झंजे,लक्ष्मी घागरे, समाधान झंजे, दादा मासाळ, ओंकार गुरव,अक्षय मासाळ, दिनेश घागरे, दिपाली वाकसे यांनी केले आहे. गावातील व परिसरातील लोकांनी उपस्थित राहून कार्यक्रम समजून घ्यावा असे नियोजन कमीटीने आवाहन केले आहे.