
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
आटपाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या हस्ते व आटपाडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयदिपभैय्या भोसले, राष्ट्रीय समाज पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष लक्ष्मणभाऊ सरगर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै.संतोषभाऊ पुजारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना तानाजीराव पाटील म्हणाले,आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती ही पश्चिम महाराष्ट्रात चांगले काम करत आहे. त्यामुळे अनेक कृषी उत्पन्न बाजार समिती पार करून शेतकरी येथे विश्वासाने आपला माल आणतात.आटपाडी तालुका हा डाळिंब उत्पादनात अग्रेसर आहे. या पॅक हाऊसमुळे डाळिंब उत्पादकांना त्यांचे डाळिंब चांगल्या पद्धतीने पॅक करून विक्रीसाठी पाठवता येईल. यामुळे डाळिंब उत्पादकांना चांगला भाव मिळेल आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल. लवकरच दिघंची येथे वेअर हाऊसची सुविधा उपलब्ध केले जाणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी डाळिंब व्यापारी पॅक हाऊसमध्ये डाळिंब पॅकिंगसाठी आधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे, डाळिंबाची साठवणूक करण्याची सुविधा उपलब्ध आहे, डाळिंब उत्पादकांना त्यांचे डाळिंब चांगल्या पद्धतीने पॅक करून विक्रीसाठी पाठवता येईल.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब व्यापारी पॅक हाऊसमुळे आटपाडी तालुक्याचा शेती क्षेत्रात विकास होण्यास मदत होईल.या पॅक हाऊसमुळे डाळिंब उत्पादकांना मोठा फायदा होईल,असा विश्वास सभापती पै.संतोषभाऊ पुजारी यांनी व्यक्त केला.
यावेळी उपसभापती राहुल गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव एस.यु.जाधव यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला सुबराव पाटील,ॲड. धनंजय पाटील,दत्तात्रय पाटील, करगणीचे दत्तात्रय पाटील,हणमंतराव पाटील, साहेबराव पाटील,गणेश खंदारे, वाय.डी.सरक, बजरंग लेंगरे, दिनकर पाटील, पोपट पाटील, बाळासाहेब मोटे, तात्यासाहेब पाटील, अनिल मुढे, पोपट गाढवे, जगन्नाथ लोखंडे, विठ्ठल गवळी,यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच तालुक्यातील मान्यवर व कार्यकर्ते,व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा
घोटवडेत वीज कोसळून म्हैस व रेडा जागीच ठार