
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पाली/बेणसे
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील चिंबोड घोटवडे येथे वीज कोसळून दुर्घटना घडलीय. शेतकरी भागू दगडू झोरे यांची गुरे चरण्यासाठी गेले असता अचानक म्हैस व रेड्याच्या अंगावर वीज कोसळली.या दुर्घटनेत म्हैस व रेडा जागीच ठार झाले. ज्या ठिकाणी वीज कोसळली तेथील झाड ही जळून खाक झाले.
पाली सुधागडात मागील काही दिवस विजांचा कडकडाट , ढगांचा गडगडाट व मुसळधार पाऊस कोसळत असून घोटवडे भागात वीज कोसळण्याची घटना घडली. घटनेची खबर पोलीस पाटील वामन सुतक व माजी सभापती पिठू डुंमना यांनी पोलीस व प्रशासनाला दिली. त्यानंतर घटनास्थळी जांभुळपाडा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत कोकरे, तलाठी अनंत वारगुडे, संजय बुरंबे,माजी सभापती पिठू डुंमना, वामन सुतक, योगेश मोरे, यमा डुंमना यांनी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. याठिकाणी अनेक गुरे चरण्यासाठी गेली होती, मात्र वीज या दोन गुरांवर पडली आणि ती गुरे दगावली. या दुर्घटनेत दुभती म्हैस तसेच रेडा जागीच मृत्युमुखी पडल्याने शेतकरी भागू दगडू झोरे यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामे करून जलद नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा