माळशिरस येथील श्रीनाथ विद्यालयाचे कराटे स्पर्धेत यश

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज,माळशिरस या विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.शतकोन कराटे डी असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने आठवी राज्यस्तरीय कराटे क्रीडा स्पर्धा कोल्हापूर येथे पार पडल्या.यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यानी बाजी मारली.
आर्यन केंगार-गोल्ड मेडल, शाहिद गुंडेवाडीकर-गोल्ड मेडल,राम वाघमोडे-सिल्वर मेडल, ज्ञानेश्वरी इनामके-ब्रांझ मेडल मिळवून यश संपादन केले.या सर्व विद्यार्थ्यांची गोवा याठिकाणी नॅशनलसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सुवर्ण कामगिरीबद्दल संस्थेचे सचिव रावसाहेब देशमुख, संचालक बाबासाहेब माने, प्राचार्य योगेश गुजरे व क्रीडाशिक्षक सचिन केंगार,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व बहुसंख्य पालक उपस्थित होते.त्यांच्या या यशाबद्दल माळशिरसमध्ये सर्वत्र गोड कौतुकाने चर्चा होत आहे.