प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील विविध प्रश्नासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. परंतु त्याची वेळेत दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ १५ सप्टेंबर रोजी महाराणा प्रताप चौक येथे रस्ता रोको आंदोलन व जत शहर बंद करण्यात येणार आहे. रिपाइं आठवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, तालुकाध्यक्ष संजय कांबळे-पाटील यांनी यासंदर्भात प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, शहरात किमान अर्धा तास तरी दररोज पाणी नियमित सोडावे, वीज वितरण कंपनीकडून चुकीच्या पद्धतीने आकारणी केली जाते त्याची चौकशी करावी, बाजारपेठेतील वाहतुकीची कोंडी सोडवावी, चोरीच्या घटना रोखाव्यात, तालुक्यातील अवैध गुटखा, दारू विक्री सुरू असून कारवाई व्हावी, अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, जत तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, जत शहरामध्ये पत्रकार भवन व्हावे, यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन