
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
१६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सांगली अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ करिता श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथे सिनियर विभागातील बी.ए.,बी.काॅम., बी.एस्सी. व बी.सी.ए. मधील मुला-मुलींची भरती निवड प्रक्रिया महाविद्यालयाच्या मैदानावर पारदर्शकपणे पार पडली. यामध्ये मैदानी चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात आली. यावेळी १६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सांगलीचे सुभेदार विठ्ठल गड, बटालियनचे बी. एच. एम. हवालदार रावसाहेब बाबर, हवालदार हंबीरराव राऊत, हवालदार रवी किरण एस.के. उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय लोंढे यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच संस्थेचे चेअरमन अमरसिंहबापू देशमुख यांची निवड प्रक्रियेसाठी मोलाची प्रेरणा लाभली.
१६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सांगलीचे कमांडिंग ऑफिसर एम. डी. नातू, ॲडम ऑफिसर कैलास चंद्र आणि सुभेदार मेजर हणमंत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
एन.सी.सी. ऑफिसर प्रा. विजय शिंदे तसेच प्रा.मोहन हजारे, प्रा. विष्णू जाधव, प्रा. परमेश्वर झाकडे, प्रा. हणमंत माने एन.सी.सी. विभागातील सिनिअर अंडर ऑफिसर अभिषेक बालटे, ज्युनिअर अंडर ऑफिसर निखिल पाटील, विकास देशमुख, संजय जगताप, समाधान बाड, स्वाती शिंदे , लक्ष्मी जाधव , साक्षी शिंदे, रोहित बालटे व एनसीसी विभागातील द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व कॅडेट्स यांनी संयोजन केले.
यावेळी भवानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश नामदास, भवानी विद्यालयाचे एन.सी.सी.ऑफिसर रामचंद्र जाधव, दिघंची हायस्कूलचे एन.सी.सी.ऑफिसर डी. एम. पाटील, डॉ.धनंजय लोहार, प्रा.गौरव चव्हाण तसेच कृष्णा खिलारी, बाळासाहेब बनसोडे, राजू पवार, पांडुरंग धादवड, गणेश लिंगे, समाधान राक्षे आदींनी भरती प्रक्रियेसाठी मोलाचे सहकार्य केले.


संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश