अंकले हायस्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

श्री सिद्धनाथ विद्यामंदिर व उद्योगपती संजय दुधाळ उच्च माध्यमिक विद्यालयअंकले येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सायंकाळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन अर्जुन दुधाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सरगर बी.पी. होते. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने केला गेला.
यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर सुंदर अशी भाषणे केली .यावेळी संपूर्ण दिवसभराचे कामकाज विद्यार्थ्यांनीच पाहिले. यावेळी सर्व शिक्षक व मुख्याध्यापक हे विद्यार्थ्यांमधूनच निवडले गेले होते व त्यांनी संपूर्ण दिवसभराचे अध्यापनाचे कामकाज पाहिले. शिक्षक बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले दिवसभराचे अनुभव सांगितले.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दिवसभराच्याअध्यापनातील काही आठवणी सांगितल्या. विश्वास पवार, नंदकुमार सरगर, राजेंद्र सरगर , मारुती गडदे ,नामदेव मंडले, हिवरे गावच्या सरपंच सविता बंडगर, कुडचे मॅडम, नाकील मॅडम उपस्थित होते.
सूत्रसंचालन सानिका दुधाळ व होनमाने यांनी केले. शेवटी आभार अनिल होनमाने यांनी मानले.