
३१ऑगस्ट हा दिवस भटक्या-विमुक्त जमातीने स्वतंत्र दिनाऐवजी संघर्ष दिन म्हणून साजरा करावा- भाई शिवराम मासाळ
अध्यक्ष बळीराजा फौंडेशन
उपाध्यक्ष सांगली जिल्हा
राष्ट्रीय घूमतू मोर्चा
३१ऑगस्ट १९५२ रोजी भारत सरकारने भटक्या विमुक्तांना गुन्हेगारीचा ठपका असलेला दूर करून स्वातंत्र्य मिळवून दिले, पण मायबाप सरकारला हे करण्यासाठी पाच वर्षांनंतर सुचले हे दूर्दैव,
तुम सब आझादी का जश्न मना रहे थे !
तब हम जंगलो में छूप रहे थे!
संपूर्ण देश १५ऑगस्ट १९४७ पासून स्वतंत्र दिवस साजरा करत आसताना आम्हीं भटके पारधी व, रामोशी, कैकाडी, भिल्ल, नंदीवाले, , भामटा, डवरी,घडशी, गोसावी, पिंगळे, मांगरामोशी,व इतर शेकडो भटक्या विमुक्त जाती जमाती हे स्वतंत्रासाठी तळमळत असताना, देखील मायबाप सरकारला ( पंडीत जवाहरलाल नेहरू) डोळे उघडायला तब्बल ५ वर्षे लागली आणी ३१ऑगस्ट १९५२ ला डोळ्यातील पाणी पुसण्याचे जसे नाटक केले जाते तसे तकलादू स्वतंत्र दिले, खरचं स्वतंत्र दिले आसते तर भटक्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निकाली काढला असता, अन्यथा आज आम्हांला संशयीत नजरेने पाहीले नसते, पारधी, रामोशी, भामटा,पोलीसांना घाबरून आहे, कुठे चोरी झाली तर लगेच आम्हां लोकांनां संशयीत म्हणून उचलायचे आणी गुन्हां नोद करायचा असे राजरोसपणे सूरू आहे, आमच्या अनेक पिढ्या अशा खोट्या गुन्हांमुळे संपल्या व आजही संपत आहेत, आणी आम्हीं मात्र आजही चोरांचा शिक्का घेऊन फिरत आसताना देखील स्वतंत्राचा अमृतमहोत्सव उत्साहाने साजरा करतोय राहायला घर नाही, कोणतं गाव हे माहीत नाही, लाखो भटक्यांना रेशनकार्ड, मतदान कार्ड, आधार कार्डचं नव्हे भारताचे नागरीक म्हणून ओळख नाही तरी देखील आम्हीं भटके अभिमानाने म्हणतो सारे जहाँ से अच्छा हिंदूस्था हमारा!
मला नाही वाटत आजही आम्हीं स्वतंत्र आहोत असेच सूरू राहीले तर आम्हीं भटके पुन्हां नव्या क्रांतीची तयारी करू मगं किती जण भरडतील हे देखील सांगता येणार नाही, भारतीय संविधानांने प्रत्येक भारतीयास समान हक्क दिला असताना, येथील प्रस्थापित सत्ताधारी जर आम्हां भटक्यांना मोजत नसेल तर आम्हीं भटके आणखी किती वर्षे आन्याय सहन करत राहणार ,ह्याचा शेवट कुठे तरी होत असतो, तो चांगूलपणाने झाला तर ठिक अन्यथा आम्हां भटक्यांना संघर्ष नवा नाही, ह्या पुढे भटक्या विमुक्त लढ्याची सुरूवात वेगळ्या पद्धतीने होईल ह्याची दक्षता मायबाप सरकारने घ्यावी.

संबंधित बातम्या
विजयादशमी दसऱ्याची प्राचीन महती, पर्यावरण रक्षण
आरेवाडीत धुमाकूळ माझ्या साहेबांमुळंच!
आटपाडीकरांनो,सर्वांगिण विकासासाठी बोलते,लिहते,कर्ते व्हा!