साहित्य सेवा मंचच्यावतीने भीमराव धुळूबुळू यांचा सत्कार

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभे (कोल्हापूर) च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. भीमराव धुळुबुळू यांचा तसेच नामदेव भोसले यांची सभेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मराठी साहित्य सेवा मंच (जत) च्यावतीने मिरज येथे शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी साहित्य सेवा मंचचे अध्यक्ष किरण जाधव, संस्थापक अध्यक्ष व संचालक लवकुमार मुळे, माजी अध्यक्ष मच्छिन्द्र ऐनापुरे, अनिकेत ऐनापुरे उपस्थित होते. जत तालुक्यातील साहित्य चळवळ व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली .
जत साहित्य सेवा मंचच्या वतीने घेण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनाचे यंदाचे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष असून लवकरच भव्य प्रमाणात साहित्य संमेलन घेतले जाणार आहे. याबाबत चर्चा करण्यात आले. यानिमित्ताने स्मरणिका व लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.