८ ऑगस्ट रोजी शुकाचारी येथे ‘शिदोरी ‘ साहित्य संमेलन

सुनील दबडे, सुधीर इनामदार, श्रीकृष्ण पडळकर, जीवन सावंत यांची माहिती
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
गोमेवाडी

आटपाडी तालुका साहित्य मंच या व्हॉट्स ॲप ग्रुपतर्फे ८ ऑगस्ट रोजी शुकाचारी येथे शिदोरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती साहित्यिक प्रा .सुनील दबडे , गझलकार श्री .सुधीर इनामदार , कथाकथनकार श्री . जीवन सावंत , निवेदक आणि कवी प्रा.श्रीकृष्ण पडळकर यांनी दिली .
आटपाडी तालुक्यातील साहित्यिकांचा नुकताच आटपाडी तालुका साहित्य मंच या नावाने व्हॉट्स ॲप ग्रुप स्थापन करण्यात आला आहे . या ग्रुपमध्ये जुने व नवीन मिळून एकूण ४० साहित्यिक आहेत. तालुक्यातील सर्व साहित्यिक एकत्र यावेत , जेष्ठ साहित्यिकांचे, नव्याने लिहू लागलेल्या साहित्यिकांना / कवींना मार्गदर्शन व्हावे , लिहित्या हातांना बळ मिळावे, तालुक्याची साहित्य परंपरा अधिकाधिक गतीमान व्हावी , तालुक्यातील गावागावांत साहित्याचे वातावरण निर्माण होऊन लोकांचे मनोरंजन व्हावे , मनोरंजनातून प्रबोधन व्हावे, प्रबोधनातून समाज परिवर्तन व्हावे. या उद्देशाने आटपाडी तालुका साहित्य मंच निर्माण करण्यात आल्याचे मत वरील दबडे – इनामदार – पडळकर – सावंत या मान्यवरांनी व्यक्त केले आहे .
या मंच मार्फत दोन महिन्यांतून किमान एक साहित्यिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे . याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात शुकाचारी या निसर्गरम्य ठिकाणी ८ ऑगस्ट रोजी शिदोरी साहित्य संमेलन घेऊन होणार आहे . आटपाडी तालुक्यातील सर्व कवी / साहित्यिक यांनी ८ ऑगस्ट रोजी आपापली शिदोरी घेऊन या दिवशी शुकाचारी (शुक्राचार्य देवस्थान ) या ठिकाणी येतील . या दिवशी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत भोजन पार पडेल . दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत कवी – संमेलन, गप्पा – गोष्टी – गाणी इत्यादी साहित्यिक कार्यक्रम संपन्न होईल .
या कार्यक्रमासाठी जेष्ठ साहित्यिक डॉ. प्रा . सयाजीराजे मोकाशी, जेष्ट कवी प्रा . सुभाष कवडे , जेष्ट साहित्यिक प्रा . विश्वनाथ जाधव , शेतकरी साहित्य इर्जिकचे सांगली जिल्हाध्यक्ष, ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक, यांच्या सहीत अनेक मान्यवर संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत . तरी आटपाडी तालुक्यातील सर्व कवी / साहित्यिक, साहित्य प्रेमीं यांनी या शिदोरी साहित्य संमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साहित्यिक सुनील दबडे , गझलकार श्री . सुधीर इनामदार , कथाकथनकार श्री . जीवन सावंत , निवेदक आणि कवी प्रा . श्रीकृष्ण पडळकर यांनी केले आहे.