कृषिकन्यांकड़ून शेतीविषयक योजना व विविध मोबाईल ॲप्लिकेशनचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

श्रीराम कृषी महाविद्यालय पानिव अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण कृषि जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाच्या माध्यमातून खुडूस येथे कृषिकन्यांकडून शेती विषयक मोबाईल ॲप्लिकेशन विषयक माहिती देण्यात आली.
यामध्ये ई-नाम,आय.एफ.एफ.सी.ओ किसान, माय एपीएमसी,किसान सुविधा, मार्केट यार्ड, ऍग्रो सोल्युशन, डिजिटल मंडी इंडिया, किसान अभिमान यांसारख्या मोबाईल ॲप्लिकेशन्स चा कृषिदैनंदिन जीवनात असलेलं महत्त्व पटवून दिले. तसेच शेतीविषयक ज्या विविध योजना , भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी अंमलात आणल्या आहेत, त्याबद्दलदेखील मार्गदर्शन करण्यात आले. परंपरागत कृषी विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली . मार्गदर्शन करताना विविध माध्यमे व साधनांचा वापर करण्यात आला. उपस्थित बंधू-भगीनिंनी कृषिकन्या घोरपडे पूनम, काळे ऐश्वर्या,पाटील गौरी, बर्गे स्नेहा, गायकवाड शिवानी, हरणावळ सुजाता, हुमणे साक्षी यांचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयाचे कृषी आर्थिक विभागाचे डॉ.राऊत.एस.डी व ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी डॉ.जे.आय शेख यांचे मार्गदर्शन लाभले.