प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यामध्ये कृषी केंद्राकडून बोगस बियाणे विकले जात आहे,अशा यापूर्वी अनेक तक्रारी आल्या आहेत. जर बोगस बियाणे विकताना एखादा कृषी केंद्रधारक सापडला तर त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी पोपट पाटील यांनी सांगितले.
अनेक दुकानदार बियाणे विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना पावती देत नाहीत,तरी शेतकऱ्यांनी पावती दुकानदारांकडून मागून घ्यावी. बियाणे पिशवी फोडताना लेबल नसणाऱ्या बाजूंनी फोडावी व ती पिशवी व बिल शेतकऱ्याने जपून ठेवावे, जर बियाणे उगवले नाही ,तर त्या बियाणाच्या कंपनी विरोधात तक्रार करून भरपाई मिळू शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना पावती घेणे गरजेचे आहे.यापूर्वी असे अनेक प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सावधानतेचा इशारा बाळगणे गरजेचे आहे.
अनेक दुकानदार शेतकऱ्यांना बियाणे खरेदीची पावती देत नाहीत, असे प्रकार तालुक्यांमध्ये अनेक वेळा घडले आहेत. तरी दुकानदारांनीही शेतकऱ्यांना पावती द्यावी व शेतकऱ्यांनीही पावती मागून घ्यावी, असे आवाहन पोपट पाटील यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले, बाजरी व मक्याचे बियाणे अनुदानावर कृषी विभाग उपलब्ध करीत आहे,तरी शेतकऱ्यांनी एकत्र ग्रुप करून बियाणे खरेदी करावे, कारण तालुक्याच्या गावापासून 50 ते 60 किलोमीटरवर काही गावे आहेत ,एकट्याला ये-जा करणं शक्य नाही, त्यासाठी शेतकऱ्यांच्या ग्रुप करून बियाणे खरेदी करावेत. आमच्याकडून सर्व ती मदत शेतकऱ्यांना केली जाईल.
त्याचबरोबर युरियाचे लिंकिंग होत असलेच्या अनेक दिवसापासून तक्रारी आहेत. येणाऱ्या खरीप हंगामाच्या सीझनला जर युरियाचे लिंकिंग झाले तर कृषी सहाय्यक किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. जादा दराने युरीया कोणीही घेऊ नये, युरियाचा तुटवडा असेल तर कृषी विभागाची संपर्क साधावा व त्या भागातील दुकानदाराचे नाव आम्हाला कळवावे, असेही तालुका कृषी अधिकारी पोपट पाटील यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा