
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदुर बाजार :
बाजारपेठेत टरबूज, कलिंगड मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
फेब्रुवारी महिन्यात शेतकरी आपल्या शेतामध्ये टरबूज उत्पादनाची लागवड करून मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी सुरुवात करत असतो. पण गेल्या दोन वर्षांत मालाला भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तशी दुर्दशा माधान येथे शेतकरी नरेंद्र पिसे व अभिजित मोहोड यांच्या शेतामध्ये ६ एकर टरबूज व २ एकर खरबूज उत्पादन करून ७ लाख खर्च आलेला आहे. उत्पादन मात्र ४ लाख बाजारपेठेत टरबूज ४ रु भाव असल्याने आत्महत्या करण्याचा उपाय उरला आहे, असे मत माधान येथील शेतकरी नरेंद्र पिसे यांनी म्हटले आहे
शेतकरी शेतामध्ये रावून दिवस-रात्र मेहनत करून टरबूज उत्पादन घेत असतो. मागील एक महिन्यापूर्वी टरबूजाला १२ रु किलो असा भाव होता.. पण आता टरबूज निघाल्यावर मालाला भाव राहला नाही.जर हेच भाव राहिले तर आत्महत्या केल्या शिवाय पर्याय राहणार नाही असे मत पिसे यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा