सेंट्रींग कामगाराची मुलगी आली १२ वी कला शाखेत संस्थेत पहिली

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

खुडूस येथील महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली संचलित महालिंगेश्वर विद्यालय व श्रीमान शेठ हिरालाल माणिकलाल दोशी ज्युनियर कॉलेज खुडूस येथे कला विभागात कु.प्रणाली प्रताप कांबळे हिने ८२.८३% गुण मिळवत विद्यालयात प्रथम तसेच संस्थेतही प्रथम क्रमांक मिळवल्याने तिच्यावर खुडूस व परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तिचे वडील प्रताप कांबळे हे सेंट्रींगचे काम करतात, हालाखीच्या परिस्थितीतून मुलीने मिळवलेल्या यशाबद्दल ते आनंदित असून आपल्या कष्टाचे चीज झाले असे त्यांनी सांगितले तसेच त्यांना चार मुली असून मुलींना आपण शिक्षणाची कमतरता भासू देणार नाही व इतरांनीही आपल्या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू नये त्यांना शिकु द्यावे असे सांगितले.
सदर विद्यार्थ्यांनी कु.प्रणाली कांबळे हिच्या यशात विद्यालयाचे प्राचार्य स्वामी सर तसेच वर्गशिक्षिका कुलकर्णी मॅडम सर्व शिक्षक यांचा व आई वडील यांचाही सिंहाचा वाटा असल्यानेच आपण हे यश मिळवु शकले असे प्रणाली हिने सांगितले.