जत विधानसभेचे चित्र बदलले पाहिजे – जगन्नाथ माळी

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन परिषद जत तालुका यांच्यावतीने ओबीसी आरक्षण व जनजागृती याविषयी बैठक आयोजित करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी परिषदेचे निमंत्रक जगन्नाथ माळी सभापती बांधकाम व अर्थ, राज्य संघटक नंदकुमार निपलकंठ, सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील गुरव, वाळवा तालुक्याचे अध्यक्ष धनपाल माळी, जिल्हा उपाध्यक्ष दिनकर पतंगे, जिल्हा संघटक तुकाराम माळी यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रास्ताविक व स्वागत जत तालुका अध्यक्ष सागर तानाजी शिनगारे यांनी केले व आभार कार्याध्यक्ष श्रीशैल उमराणी यांनी मानले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष निमंत्रक जगन्नाथ माळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जिल्हा परिषदमधील निवडून आलेले ओबीसीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य यांनी ओबीसीच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करून त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ही ओबीसी चळवळ या जत तालुक्यामध्ये मोठ्या व्यापक स्वरूपात करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हा मतदारसंघ ओबीसी आणि व्हीजेएनटी हाच आहे
, हे आता सर्वांना ज्ञात झालेले आहे. येत्या विधानसभेचा उमेदवार हा ओबीसी हाच असला पाहिजे, त्यासाठी या तालुक्यातील सर्व ओबीसी आणि व्हीजेएनटी मतदाराने हे चांगले लक्षात ठेवून त्यांना निवडून आणायचे आहे, ही जत मतदारसंघातील सर्वांची जबाबदारी आहे.
जत विधानसभा मतदार संघात शंभर टक्के बदल झाल्यास संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास आज प्रत्येक ओबीसी आणि व्ही जे एन टी मतदारांच्या मनात रुजलेला आहे. आता फक्त प्रत्यक्ष कारवाई करण्याची गरज आहे.
याप्रसंगी आशाराम चौगुले, पत्रकार प्रमोद क्षीरसागर,ज्येष्ठ पत्रकार नजीर भाई च्यट्टरगी ,भारत क्षीरसागर, राजेंद्र आरळी, सोमनाथ पाटील, प्रकाश चौगुले, सुरेश घोडके, संजय खांडेकर, महादेव कुंभार, सुनील हेगडे, अक्षय कोळी, शोभा गुरव, प्रकाश गुरव, उपस्थित होते.