डॉ.शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाची आटपाडी येथे रविवार दि.५ रोजी आढावा बैठक

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

थोर साहित्यिक व आटपाडीचे सुपुत्र डॉ.शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी सांगता समारोह सोहळ्यानिमित्त आटपाडी येथे दि.११ व १२ जुलै,२०२२ रोजी ‘डॉ.शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलन, आटपाडी २०२२’ असे दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या नियोजनाची महत्त्वपूर्ण सर्वव्यापी बैठक रविवार दि. ५ जून २०२२ रोजी दुपारी २.०० वाजता श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी, आटपाडी जि.सांगली येथे आयोजित केली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत.
या बैठकीमध्ये
१) साहित्य संमेलनाचे आथिर्क नियोजन करणे.
२) साहित्य संमेलनाची रुपरेषा ठरविणे.
३) विविध प्रकारच्या समित्यांची स्थापना करणे व जबाबदारी वाटप करणे.
४) सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देणे बाबत चर्चा करणे.
५) आयत्या वेळच्या विषयावर अध्यक्षांच्या परवानगीने विचार विनीमय करणे.
यासह अन्य नियोजनाच्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.
तरी सर्व साहित्यिक,विचारवंत,साहित्यप्रेमी,शिक्षक, पदाधिकारी, पत्रकार,विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावेे, असेे आवाहन साहित्यरत्न डॉ.शंकरराव खरात प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला शंकरराव खरात, उपाध्यक्ष डॉ.रविंद्र शंकरराव खरात व सचिव विलास खरात यांनी केलेे आहे.