
त्यानिमित्त होताहेत विशेष सत्कार व अभिनंदनाचा वर्षाव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कच्या वृत्तनिवेदिका प्रा.कु.कविता महादेव यादव यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने ‘राज्यस्तरीय आदर्श युवती महाराष्ट्र युद्ध आयडॉल कलारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत येत असून महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रा.कु.कुमारी कविता महादेव यादव या दिघंची येथील इंद्रभाग्य कृषी व ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलामध्ये उच्च माध्यमिक विभागात शास्त्र शाखेत अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्याबरोबर त्यांनी निवेदनाचाही छंद जोपासला आहे. प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कच्या त्या वृत्तनिवेदिका आहेत. विविध शैक्षणिक, सामाजिक,धार्मिक यासारख्या कार्यक्रमांमधूनही त्या निवेदिका म्हणून ख्यातनाम आहेत.
दिघंची येथील जन्मगाव असलेल्या कविता यादव यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण, दिघंची गर्ल्स हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण, आटपाडी येथील आबासाहेब खेबुडकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे उच्च माध्यमिक शिक्षण, श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय येथे शास्त्राच्या पदवीचे शिक्षण, तसेच मुंबई येथील वा.ना.बेडेकर कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण झाले.तसेच गीता बनकर शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयात अध्यापन शास्त्राच्या पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना कलेची आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाले. याच कलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात त्यांनी कार्यक्रम केले. त्यांनी पहाडी आवाजाची निवेदिका अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात निवेदक हा व्यासपीठ आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा ठरतो.
‘स्वतःच्या स्पष्ट शब्दशैलीने आपले मत स्पष्टपणे, खड्या आवाजात मांडताना एक वेगळा आनंद मिळतो, एक स्वतःची वेगळी ओळख मिळते. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्त्व म्हणून जगावे हीच ओळख या क्षेत्रामुळे प्राप्त झाल्याचे’ त्यांनी मत व्यक्त केले आहे.
निवेदिका म्हणून नावलौकिक मिळाल्यानंतर त्यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार २०२०, आदर्श सेवा सन्मान पुरस्कार २०२१ व आत्ता राज्यस्तरीय आदर्श युती महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत. त्यातून त्यांनी प्रेरणा घेतली. कलेच्या माध्यमातून समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क मध्ये त्यांच्या खास ढंगातील वृत्त निवेदनामुळे या न्यूज नेटवर्कला त्यांनी एका खास शैलीच्या उंचीपर्यंत नेऊन ठेवले आहे. निवेदनामध्ये त्यांच्या आवाजाची श्रोत्यांना वेगळी आवड निर्माण झाली आहे. त्यांच्या आवाजाच्या ढंगामुळे वेगळा श्रोता वर्ग निर्माण झाला आहे.
त्यांच्या या भव्यदिव्य यशाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या, युवा नेते अनिलशेठ पाटील, आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. तसेच दिघंची गावचे सरपंच अमोल मोरे, आटपाडी येथील युवा नेते दिग्विजय देशमुख यांनी या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन करून विशेष सत्कार केला आहे. पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु