जतमध्ये रक्तदान शिबीर संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त आयोजन
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त विशेष जिल्हा समाजकल्याण कार्यालय सांगली द्वारा आयोजित रक्तदान शिबीर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जत या ठिकाणी प्राथ.आ.शाळा सनमडी व प्रा.आ.शाळा माडग्याळ यांच्या सहकार्याने पार पडले…
संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर प्रमुख पाहुणे व माध्यमिक आश्रम शाळा क.महांकाळचे मुख्याध्यापक ठोंबरे अध्यक्षस्थानी होते..
अध्यक्षांच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून रक्तदान शिबीर सुरु करण्यात आले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज व प.भू वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली यांच्या रक्तपेढीतील डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील प्राथ,माध्य,उच्च माध्यमिक शाळेतील व श्री. उमाजीराव सनमडीकर मेडीकल फौंडेशन जत च्या सर्व शाखेतील मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित राहून विशेष सहकार्य केले.