संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला चार राज्यात घवघवीत यश मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्याच्या वतीने एकमेकांना लाडू भरवून जल्लोष करण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.यामध्ये विशेषतः माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्याकडे गोवा राज्यातील म्हापसा या मतदारसंघाची जबाबदारी होती आणि या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जोशुआ डिसूजा विजय झाल्यामुळे कार्यकर्त्यांना दुहेरी आनंद झाला आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा सहप्रभारी के.के.पाटील, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, संघटन सरचिटणीस संजय देशमुख, उपाध्यक्ष लक्ष्मण माने, युवा उपाध्यक्ष मारुती वाघमोडे, अँड शरद मदने, युवा सरचिटणीस युवराज वाघमोडे, जळभावीचे सरपंच किसन राऊत, भानुदास चोरमले, नाना चोरमले, किशोर तुपसौंदर, महादेव ठवरे, मिनीनाथ मगर, आदि मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन