माडगुळे येथे फिनोझेनतर्फे शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माडगुळे :

माडगुळे येथे सौरभ विभुते यांच्या श्री साई रोपवाटिका येथे फिनोझेन विद्राव्य खताच्या कंपनीमार्फत शेतकऱ्यांशी चर्चासत्राच्या माध्यमातून पदाधिकारी यांनी थेट संपर्क साधला.
पिकाच्या शरीरक्रिया शास्त्राचा अभ्यास करून शेतकऱ्यांसाठी संशोधीत, विकसित व उपलब्ध करून दिलेल्या विद्राव्य खतांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापर करून आपल्या पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन वाढवावे असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.फिनोझेनने तयार केलेल्या विद्राव्य खतात निरनिराळ्या विद्राव्य खतांचा समावेश आहे. ही विद्राव्य खते तयार करताना कंपनीने कमीत कमी क्लोराईड व अती अहितकारक अशुद्धतेचे मिश्रण काढून जास्तीत जास्त शुद्धता हे तत्व वापरले आहे.त्यामुळे ही सर्व खते कशी शुद्ध ( कोणतीही भेसळ नाही) आहेत व शेतकऱ्यांना कशी फायदेशीर आहेत याची सविस्तर माहिती दिली.
सेल्स ऑफिसर विवेक खोत , सेल्स इंजिनियर सोमनाथ टोबें, चेतन जाधव ,बी टेक एग्रीकल्चर रंजीत घाडगे यांनी कंपनी निर्मित विद्राव्य खतांची माहिती व शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी टेक एग्रीकल्चरल रणजीत घाडगे यांनी केले. कार्यक्रमास माडगूळे परिसरातल शेतकरी उपस्थित होते. तुषार (शेठ) विभुते यांनी आभार मानले.