
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत पाटील यांनी शनिवारी शेटफळे येथील प्रगतशील डाळिंब बागायतदार रुपेश गायकवाड यांच्या डाळिंब बागेला भेट देऊन बागेची पाहणी केली.
यावेळी बोलताना कुलगुरू पाटील म्हणाले, रुपेश गायकवाड या तरुणाचा इतर शेतकर्यांनी आदर्श घ्यावा,अशा पद्धतीचे बागेचे व्यवस्थापन केले आहे.उत्कृष्ट पिकाला उत्कृष्ट दरही मिळतो. रासायनिक खते, औषधांंऐवजी सेंद्रिय खत व नैसर्गिक औषधांचा वापर ही काळाची गरज आहे. त्यामुळे डाळिंब बागेतील येणारी फळेसुद्धा पौस्टीक व आरोग्यवर्धक तयार होतात. अशा फळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भावसुद्धा चांगला मिळतो.
यावेळी प्रशांत पाटील यांचा रुपेश गायकवाड यांचेकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अमर गायकवाड, राहुल गायकवाड, सुभाष गायकवाड, शिवाजी गायकवाड,भारत गायकवाड उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा