पुरोगामी महाराष्ट्रातील जातीवादाचा बुरखा टराटरा फाडून समतेची कावड खांद्यावर घेऊन जाणारा नेता म्हणजे आम.गोपीचंद पडळकर : भाई शिवराम मासाळ यांचा विशेष लेख
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
पुरोगामीचा बुरखा पांघरलेल्या जातीयवादी महाराष्ट्रात आमदार गोपीचंद पडळकर यांचा समतेचा विचार छोट्या-छोट्या गोष्टींतून पुढे येताना दिसतोय.
गावगाड्यात सरपंचपद हे तसे मानाने फार मोठे असते अथवा आहे, हे कोणीही व्यक्ती नाकारणार नाही.आ.गोपीचंद पडळकर यांची राजकारणातील सुरूवात अगदी लहानशा गावांतून झाली असली, तरी अगदी वयाच्या २५ व्या वर्षात राजकिय प्रगल्भता प्रचंड आणि समतेचा विचार अगदी ठासून भरलेला मी पाहिला आहे.अगदी राजकारणातल्या सुरूवातीच्या काळातील काही निर्णय विचार करायला लावायचे, हे मी अगदी जवळून बघतोय.
आ.गोपीचंद पडळकर यांच्या वयाच्या २५ व्या वर्षी राजकीय सूरुवात करताना पडळकर यांच्या नेतृत्त्वाखाली आटपाडी तालुक्यातील निंबवडे,जांभुळणी,हिवतड,झरे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढवल्या गेल्या. त्यातचं हिवतड ग्रामपंचायतीमध्ये दोन सदस्य निवडून आले. निंबवडे ग्रामपंचायतीमध्ये तीन सदस्य , आणि झरे ग्रामपंचायतीमध्ये माजी उपसभापती नारायण(आण्णा) चवरे यांच्या मदतीने चार सदस्य निवडून आले.
जांभुळणी ग्रामपंचायतीमध्ये तर कमालचं झाली. सातच्या-सात सदस्य निवडून आणून राज्यातील त्यांच्या नेतृत्वातील पहिली ग्रामपंचायत म्हणून सुवर्णक्षणाचा इतिहास रचला गेला, आणि इथेच आ.गोपीचंद पडळकर यांचा विचार लोकांसमोर प्रसूत झाला. ज्या जांभुळणी गावात धनगर आणि मराठा समाजाचे प्राबल्य आहे, तिथे गावात एकच घर असलेल्या गुरव समाजाच्या महिला भगिनीला सरपंचपदी विराजमान करून महाराष्ट्र महाराष्ट्रापुढे एवढ्या कमी वयात समतेचा आदर्श घालून दिला.पुढे त्यांचेच सहकारी मित्र मागासवर्गीय समाजातील अनुसूचित जाती प्रवर्गाचे कैलास वाघमारे यांना झरे गावातील ८० लाख रू.च्या जलस्वराज्य योजनेच्या अध्यक्षपदी विराजमान केले. तसेच झरे येथेच रामोशी समाजाला संधी देऊन मनोहर चव्हाण यांना उपसरपंच केले.
पुढील काळात निंबवडे गावात पडळकर यांच्या विचारांची एकहाती सत्ता आली, तेव्हा भावकी नसलेल्या मंगेश दादा मगदूम यांना सरपंचपदी निवडले व तीन-चार उंबरा असलेल्या रमजान तांबोळी यांना उपसरपंचपदी निवडले.
यथावकाश आमदार गोपीचंद यांचा तालूक्याच्या राजकारणात दबदबा वाढत चालला, तसा समतेचा विचार पुढे जाताना दिसतोय. घाणंदसारख्या गावात हाडाचा कार्यकर्ता असेलला राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या मराठा समाजाच्या कुटूंबातील पोरगा उमेश ढगे पार्टीप्रमुख केला आणि त्यानेही सत्ता मिळवून दाखवली आहे.
आटपाडी तालुक्यात खच्चून सहा-सात घरे असलेली भावकी ओलेकरांची! पण जेव्हा मार्केट कमेटीत स्विकृत तज्ञ संचालक नेमणूक करायची वेळ आली, तेव्हा जुने सहकारी मोहन ओलेकर यांचे बंधू अॅड. वसंतराव ओलेकर यांची निवड केली. हिवतडमध्ये देखील संख्येने कमी असलेल्या भावकीत जनतेतून उमेदवारी सौ.रूपाली उमाजी सरगर यांना देऊन निवडूनही आणले.
तसेच निंबवडे पंचायत समिती गणात पडळकर यांच्यावर जीव ओवाळून टाकणारा कार्यकर्ता म्हणजे जयवंतराव सरगर ! त्यांना भाजपाच्या एका विभागाचे जिल्हाध्यक्ष केले.जयवंतराव सरगर यांच्या पत्नी सौ.पुष्पाताई सरगर यांना पं.स.उमेदवारी देऊन विक्रमी मतांनी विजयीदेखील केले.जसजशी संधी मिळेल तसे उपसभापती, नंतर सभापतीपदी संधी दिली.
कालपरवा पारेकरवाडी येथे सरपंच निवड झाली. पारेकरवाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठा समाजाची व्यक्ती सरपंचपदी विराजमान झाली.पारेकरवाडीत एकूण मराठा समाजाची एकाचं आडनावाची ७०-८० घरे असतील, पण एकचं घर असलेल्या सौ.सुवर्णी नाना तरसे यांना सरपंचपदी निवडून दिले.पिंपरी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी माने या युवकास संधी दिली.
कोणतेही सामाजिक आरक्षण नसताना अशी समतेची कावड खांद्यावर घेऊन वावरताना त्यांच्या कार्याने ऊर भरून येतो आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विचारांपुढे नतमस्तक झाल्याशिवाय रहावत नाही.
(भाई शिवराम मासाळ यांचे विचार)

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद