लिंगायत समाजाच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आंदोलन करु : अजित देविदास गुजरे
ऋषिकेश पाटील
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ पिलीव:
लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसह मुलभूत सेवा उपलब्ध करण्याची मागणी वीरशैव लिंगायत समाज संघटनेचे माळशिरस शहर अध्यक्ष अजित देविदास गुजरे यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की,माळशिरस शहरात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. आजपर्यंत हा समाज इमाने इतबारे मोलमजुरी करून या गावात रहात आहे. या समाजातील व्यक्ती जशी जन्माला येते, तशीच ती मरण पावते.या समाजातील व्यक्तींना मरणानंतर होणारे विधी करण्यासाठी सुद्धा धड जागा उपलब्ध नाही. एखादी व्यक्ती मरण पावली आणि त्या व्यक्तीला दफन करण्यासाठी खड्डा घ्यायला गेल्यास, पहिल्या मयताची हाडे लागतात.अरे आम्ही लिंगायत समाजात जन्म घेऊन एवढा काय मोठा गुन्हा केलाय?
प्रत्येक निवडणुकीला सर्वांनी समाजाला आश्वासन द्यायची आणि निवडून आल्यानंतर विसरून जायचे,ही कोणती पद्धत? समाजातील लोक गरीब आहेत, कोणाला काही बोलू शकत नाहीत, याचा अर्थ असा धरायचा का की, कायमच हा समाज आपल्या प्राथमिक गरजांपासून वंचित ठेवायचा? अरे आम्ही अजून किती दिवस वंचित रहायचे ते तरी सांगा? अहो, आसपासच्या गावात बघा कशा स्मशानभूमी वसल्या आहेत. बाहेरगावचे पाहुणे मयताला आले की अक्षरशः शिव्या देतात. अरे आता तरी आमच्या समाजावरील अत्याचार बंद करा आणि आम्हाला स्मशानभूमी मिळवून द्या. नाही तर मग ऐन निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला आंदोलन करावे लागेल.
याची प्रशासनानेही दखल घ्यावी अशी विनंती वीरशैव लिंगायत समाज संघटनेचे माळशिरस शहर अध्यक्ष अजित देविदास गुजरे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद