कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क

पिलीव

माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील शेतकरी कैलास रामचंद्र घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाने हल्ला केला यामध्ये गाईचा जागेवरच मृत्यू झाला.सदरच्या मृत्यूमुखी पडलेल्या गाईचा वनविभागाने रितसर पंचनामा केला आहे.

या भागात ऊसाचे व बागायती ऊसाचे मोठे क्षेत्र आहे .यापुर्वी सुद्धा या भागात तरस व इतर प्राणयांचा वावर कायम आढळून आला आहे. मोठ्या प्रमाणात जनावरावर हल्ला करीत शेळ्या, मेंढया व इतर जनावरावर हल्ला केला होता यामध्ये अनेक जनावरे मृत्यू मुखी पडली आहेत यामुळे शेतकऱ्यांनचे प्रचंड मोठे आर्थीक नुकसान झाले आहे.

यामुळे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री पिकांना पाणी देणे अवघड झाले असुन यामुळे सध्या या भागात शेतकऱ्यांनमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या भागात कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत.वनविभागाने ताबडतोब या भागातील हिंस्र प्राणयांचा बंदोबस्त करावा _ कैलास घोंगडे ,शेतकरी कुसमोड