
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
केंद्र सरकारने होऊ घातलेले शेतकऱ्यांच्या विरुद्धचे अन्यायकारक कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेतले. देशभरातील शेतकऱ्यांनी गेली वर्षभर उभारलेल्या या लढ्याला यश आले असून या आंदोलनाला काँग्रेस पक्षासह अनेक घटक पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्या सर्वांचे आभार जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मानण्यात आले. यावेळी साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. देशभरातील शेतकऱ्यांसह काँग्रेस पक्षाने उभारलेल्या लढ्याचा हा मोठा विजय आहे. यापुढील काळातदेखील काँग्रेस पक्ष आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,असे गौरवोद्गार काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी काढले.
यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार,जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,बाबासाहेब (तात्या) कोडग, अँड. युवराज (बाळ)निकम, सुजय उर्फ (नाना)शिंदे, माजी नगरसेवक परशुराम मोरे, निलेश बामणे, फिरोज नदाफ, तुकाराम माळी यांच्यासह काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन