जत शहरात युवा सेनेची महागाई विरोधात रॅली

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :

राज्याचे पर्यावरण मंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात सायकल रॅली काढण्यात आली होती.केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाईच्या निषेधार्थ म्हणून जत शहरांमध्ये युवासेना जत तालुका प्रमुख सचिन मदने यांनी रॅलीचे नियोजन केले होते.
यावेळी बोलताना सचिन मदने म्हणाले,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशातील नागरिकांना अच्छे दिन आणतो असे सांगत देशातील नागरिकांची खूप मोठी फसवणूक केली आहे. मोठ्या-मोठ्या अच्छे दिनाच्या घोषणा केल्या. प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा करतो असे सांगितले. काँग्रेसने खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यांचे पैसे कुठे आहेत ?कोणत्या देशामध्ये आहे? ते मला माहित आहे. तुम्ही आम्हाला निवडून द्या, ते पैसे भारतात आणून भारतातील सर्व नागरिकांच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये जमा करतो, अशी मोठी घोषणा केली.
आज नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन सात वर्ष होऊन गेली, तरी प्रत्येकाच्या खात्यामध्ये सात रुपये जमा झाले नाहीत. हेच भारतीय जनता पार्टीचे पुढारी ज्यावेळेस ६० रुपये लिटर पेट्रोल, ५२ रुपये लिटर डिझेल, ३८० रुपये गॅस, ५० रुपये किलो खाद्यतेल, ३० रु.डाळींचे भाव होते, त्यावेळेस मोदींनी घोषणा केली, ‘बहुत हो गई महंगाई के बार आपकी बार मोदी सरकार’ पण मोदींच्या घोषणेवर विश्वास टाकून जनतेनी भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणले. तेव्हापासून अगोदरच्या बुरे दिन यापेक्षाही बुरे दिन आज सर्वसामान्य जनतेवर आले आहेत. याच्या निषेधार्थ म्हणून युवा सेनेच्या माध्यमातून या मोदींच्या अच्छे दिनाच्या व केंद्र सरकारच्या या धोरणांचा निषेधार्थ म्हणून जत शहरांमध्ये मोठ्या संख्येने युवक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
यावेळी शिवसेना जत तालुका संघटक अमित दुधाळ, कामगार सेनेचे राज्याचे नेते दिनकर पतंगे,युवा सेना जत तालुका प्रमुख सचिन मदने,शहर प्रमुख ज्ञानेश्वर धुमाळ,विकी पाचंगे,शंकर पुजारी,कुमार माळी,सचिन कोळेकर,महेश कोळी,सुरेश कोळी,अनिल माने,योगेश वाघमोडे,आदि युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.