जतमध्ये ‘सोनाली क्लिनिक’ व ‘जय मल्हार फाउंडेशन’च्यावतीने आरोग्य शिबीर

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

जत एकात्मिक विकास फाउंडेशन संचलित ‘सोनाली क्लिनिक’ व जय मल्हार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या आरोग्य शिबीराचे उदघाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे व आमदार रोहित दादा पवार यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सागरदादा शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले.
जय मल्हार फाउंडेशनचे अध्यक्ष तथा रिपाई युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.हेमंत चौगुले,रिपाई जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे,राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी अध्यक्ष पवन कोळी, भाजप नेते संतोष मोठे,सामाजिक कार्यकर्ते बंटी नदाफ,जयंत भोसले,शफीक इनामदार,प्रवीण यादव,दत्ता पवार, अनिल सूर्यवंशी,रामदास भोसले,मुनीर नदाफ,इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.