

जतमध्ये टोमॅटोचे दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटोने भरलेले कॅरेट जत बाजार समिती समोरील हायवेवर ओतले
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जतसारख्या दुष्काळी भागात सतत पडणारा दुष्काळ व कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही.गेल्या काही दिवसात भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.जत येथील राजे विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवारातील भाजीपाला मार्केटमध्ये सलग १५ दिवस टोमॅटोच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे.यामुळे जत येथील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने भाजीपाला मार्केट समोरील महामार्गावर सुमारे दीड टन इतका टोमॅटो ओतून निषेध व्यक्त केला आहे.
उत्पादित शेतीमालाला दर नाही.टोमॅटोला प्रति किलो दोन ते तीन रुपये इतका अत्यल्प दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला व्यवस्थापनासाठी घातलेला खर्चदेखील निघत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
सद्यस्थितीत मार्केटमध्ये दोडका, टोमॅटो, ढबू मिरची, वांगी या भाजीपाल्यालाचे दर पडले आहेत.जत येथे भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.हा भाजीपाला मंगळवेढा,सांगोला,जत येथून येत आहे. या भाजीपाल्यास सांगली,कर्नाटक,विजापूर,जमखंडी,सांगोला येथून मागणी आहे.


संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा