तावशीत शेतकऱ्यांना कृषीदूताचे मार्गदर्शन!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पंढरपूर :
सौ.के.एस.के.(काकू) कृषी महाविद्यालय बीड अंतर्गत कृषीदूत गणेश मारूती शिराम यांनी शेतकऱ्यांना पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे कृषीविषयक मार्गदर्शन केले.यापुढेही अविरण करणार आहेत.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत ग्रामीण कृषीदूत जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव २०२१ / २२ या वर्षासाठी कार्यक्रम अंतर्गत तर शेतकऱ्यांना शेती,जलसिंचन, कृषी शिक्षण, पशुधन,कृषीविषयक विविध शासकीय योजना आदि सविस्तर माहिती देणार आहेत. ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ.के.एस.के. ऊर्फ काकू कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.शिंदे, ग्रामीण जागरूकता कार्यक्रमाचे प्रभारी प्रा.बी.डी.तायडे, डॉ. एस. पी.मोरे , डॉ. एस. एस.चव्हाण, प्रा. एस. पी.शिंदे, प्रा. एस. टी.शिंदे ,प्रा. बी. बी. तांबोळकर ,प्रा. बी. आर.चादर ,प्रा. एस. व्ही.राठोड ,प्रा. एस. एस.राठोड, प्रा. पी. बी. मांजरे, प्रा.डी.एस.जाधव, प्रा.बी.डी.बामणे यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रात्यक्षिकातून मिळालेल्या माहितीबद्दल तावशी गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.