
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /चांदूर बाजार (अमरावती):
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणा-या पिंपळखुटा अमरावती येथील संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय येथील बीएस्सी. कृषी अंतीम वर्षाचे शिक्षण घेत असलेली ज्ञानेश्वरी राजेंन्द्र भस्मे या विद्यार्थीनीने कृषीदूत म्हणून आपल्या शिक्षणातील एक भाग असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव या उपक्रमा अंतर्गत शेतक-यांना बोंड अळी कशी निंयत्रणात आणता येईल यावर शेतात जावुन पिंकाची पाहणी करुन मार्गदर्शन केले.
दरवर्षी पिकावर विविध प्रकारचे किड आढळतात मुख्य म्हणजे कपाशी पिकावरील गुलाबी बोंड , मावा , तुरतुळे , पांढरी माशी इत्यादीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी रासायनिक पध्दतीचा वापर केला जातो. या पध्दतीने जमिनीतील उपयुक्त किंड्याचादेखील नाश होतो व जमिनीची सुपिकता देखील कमी होत चालली आहे. म्हणुनच शेतक-यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन करणे गरजेची आहे. यासाठी शेतक-यांनी कपाशीमध्ये पिवळा चिकट सापळा , कामगंध सापळा लावुन बोंड अळी , पांढरी माशी व इतर उडणारे किडे निंयत्रणात आणण्यास मदत होते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.यु.पाटील , उपप्राचार्य डॉ.शरद नायक, कार्यक्रम प्रभारी प्रा.पी. व्ही.चिमोटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा