

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:
माळशिरस येथील श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज या विद्यालयात व्यवस्थापनाने अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना महामारीत अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली.यामध्ये काहींचे छत्र देखील हरवले. म्हणून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात ज्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली असे संस्थाध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांनी कोरोना काळात ज्यांचे आई-वडील किंवा दोन्ही पैकी एक व्यक्ती मृत झाले असल्यास अशा पाल्यांचे पालकत्व स्वीकारुन आपल्या श्रीनाथ विद्यालयात प्रवेश देऊन बारावी पर्यंतचा सर्व शिक्षणाचा भार उचलणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
ज्या विद्यार्थ्यांना अशा संकटाना सामोरे जावे लागले अशा विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण माहितीसह विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश गुजरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश