

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी नुकताच जत तालुक्यातील पूर्व भागातील 65 गावांना 6 टीएमसी पाण्याची उपलब्धता म्हैसाळ योजनेतून करून देण्याची घोषणा केल्याबद्दल आज जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार विक्रमसिंह(दादा)सावंत,जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, माजी नगरसेवक परशुराम मोरे, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. युवराज निकम, नाना शिंदे, बाबासाहेब कोडग,गणी मुल्ला, निलेश बामणे, सर्व काँग्रेस पदाधिकारी,आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पं स.सदस्य नगरसेवक,सरपंच, युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन