अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
घोलेश्वर येथील शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्यात मुख्य कालव्यासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्यामुळे खेटे घालून थकलेल्या शेतकऱ्यांनी सलीम गवंडी यांच्या नेतृत्वाखाली चक्क आमदार विक्रमदादा सावंत यांच्या कार्यालयासमोरच उद्या उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हैशाळ योजनेच्या सहाव्या टप्प्यात मुख्य कालवाअंतर्गत घोलेश्वर ता.जत येथील शेतकऱ्यांची सुमारे ३५ ते ४० हेक्टर शेतजमीन जमीन अधिग्रहण केलेली आहे.२००९ पासून शेतकऱ्यांना गेलेल्या जमिनीचा लाभ मिळाला नसून वारंवार लेखी,तोंडी,प्रत्यक्ष संबंधीत पाटबंधारेच्या खात्यातील अधिकाऱ्यांना भेटून पाटबंधारे अधिकारी व उपविभागीय अधिकारी,उपविभाग जत यांच्या प्रत्यक्ष चर्चासुध्दा करणेत आलेली आहे. मात्र आजअखेर या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. राज्यकर्ते मंडळी व संबंधित अधिकारी यांनी शेतकऱ्यांची थटटा लावलेली असून वारंवार लेखी,तोंडी निवेदन, उपोषणाचीसुध्दा नोटीस देऊन गेली ९ ते १० वर्षे मुख्य कालव्यामध्ये गेलेल्या जमिनीचा लाभ घेणेसाठी शेतकऱ्यांना ‘वेट अॅण्ड वाॅच ‘ म्हणत बसायची पाळी आलेली आहे. या कॅनॉलमधून गावतळे भरणेसाठी जे पाणी सोडणेत आले, त्यामध्ये शेतकऱ्यांची जमीन धुऊन जाणे, अशा पध्दतीचे अनेक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमवार दि. १२ रोजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या मार्केट यार्ड कार्यालयासमोर अमरण उपोषण बसणार असल्याचे सलीम गवंडी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा