माळशिरस तालुक्यात एकाच ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा

कोविड-१९ अनुषंगाने आदेशाचे पालन
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव उपविभागीय अधिकारी विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून माळशिरस तहसील कार्यालयासमोर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी माळशिरस तालुक्यामध्ये कोविड-१९ ची रुग्णसंख्या वाढत असल्याने दि.१३/०८/२०२१ पासून कडक निर्बंध लागू केले आहेत.त्यामुळे १५ ऑगस्ट हा भारतीय स्वतंत्र दिनाचा ७५ वा वर्धापन दिन तालुका मुख्यालयाच्या केवळ एकाच ठिकाणी, तहसील कार्यालय येथे विहित करण्यात आलेल्या वेळेत साजरा करणेबाबत निर्देश दिले होते.त्या अनुषंगाने माळशिरस तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी माळशिरस विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते तालुक्यातील सर्व कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साधेपणाने ध्वजारोहण करण्यात आला.
या कार्यक्रमास माळशिरस उपविभागीय अधिकारी विजयकुमार देशमुख,तहसीलदार जगदीश निंबाळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू,नगरपंचायत मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे,माळशिरसचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड,अकलूजचे पोलीस निरीक्षक अरुण सुगवकर,नातेपुतेचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर,वेळापूरचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेळके,गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील,पंचायत समिती सभापती शोभाताई साठे,उपसभापती प्रकाश पाटील,उप परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड,वन परिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे ,निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख , नामदेव काळे यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.